महाराष्ट्रात सणांना विशेष मान आहे आणि या सणांची सुरुवात होते ती मकरसंक्रांतीपासून.....
मकरसंक्रांतीपासून रथसमाप्तीपर्यंत ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणत सर्वाना तीळगूळ व हलवा वाटला जातो. यामागे खूप व्यापक अर्थ दडलेला आहे. आपले अंत:करण तीळाप्रमाणे स्निग्ध व गुळाप्रमाणे गोड असावे, परस्परांमधील प्रेम, वडीलधाऱ्यांविषयी आदर, शेजारीपाजारी, नातेवाईक, मित्रपरिवार यांच्यातला स्नेह वृद्धिंगत व्हावा, या सद...्भावनेने आणि उदात्त हेतूने तीळगूळ वाटला जातो. आपल्या बोलण्याचा योग्य परिणाम साधण्यासाठी शब्दांत शक्यतो माधुर्य असावं. सत्य सांगताना समोरची व्यक्ती दुखावली जाणार नाही अशा शब्दांत ते सांगावं. याचा अर्थ अवास्तव स्तुती करणं, तोंडदेखलं नाटकी बोलणं आणि पाठ फिरली की निंदा करणं असा नव्हे, बरं का! कटू सत्यसुद्धा मृदु शब्दांत सांगितलं की ऐकणाऱ्यालाही ते पटतं.
‘शुगरकोटेड पिल’ माहिती आहे ना? कडू औषध जातं की नाही बरोबर पोटात !
काळा पेहेराव हा या सणाचा खास ड्रेसकोड ! अरे, तुमचा गाल असा टुम्म फुगलाय का? हं, तीळगुळाचा लाडू तिथे बसलेला दिसतोय ! आता गोड बोलण्याचा मंत्रही विसरू नका हं !... "तीळगुळ घ्या आणि गोडगोड बोला."
मकरसंक्रांतीच्या माझ्या सर्व बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा !!!
 
Top